गोंदिया : गोंदियात झाडाची प्लास्टिक सर्जरी, राज्यात पहिलाच प्रयोग

Continues below advertisement
देवरी तालुक्यातील मर्मजोग गावात जिल्हाधिकाऱ्यांनी अनोखी शक्कल लढवत चक्क मानवी देहाप्रमाणे एका झाडाची सर्जरी करत झाडाला जीवनदान दिले आहे.

देवरी तालुक्याच्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मर्मजोग गावातील एका अज्ञात व्यक्तीने रस्त्याच्या कडेला असलेल्या 50 वर्षे जुन्या सावरीच्या झाडाला मारण्यासाठी जमिनीपासून पाच फूट अंतरावरुंन झाडाची साल कापली. त्याच रस्त्यावरुन जाताना हीच बाब तत्कालीन जिल्हाधिकारी आणि निसर्गप्रेमी अभिमन्यू काळे यांच्या निदर्शनास आली.

अभिमन्यू काळे यांनी याची माहिती वनविभागाला देत अज्ञात आरोपी विरुद्ध विना परवाना वृक्षतोड करत असल्याचा गुन्हा देवरी पोलिसात दाखल केला. तर साल कापलेल्या झाडाला पुनर्जीवन देण्यासाठी नवीन शक्कल लढवत एखाद्या मानवी शरीराप्रमाणे मोवाच्या झाडाची साल काढून सावरीच्या झाडावर प्रक्रिया करुन लावली. आज त्या झाडाला पुनर्जीवन मिळाले असून नवीन पालवी देखील फुटली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram