गोंदिया : सहा वर्षांच्या रेव्यानीकडून पाच चिमुकल्यांना जीवनदान

Continues below advertisement

गोंदियामध्ये सहा वर्षाच्या रेव्यानी राहगडाले या चिमुकलीनं अवयवदानाच्या माध्यमातून पाच बालकांना जीवनदान दिलं आहे. रेव्यानी मामासोबत बाईकवरुन जात असताना तिचा अपघात होऊन ब्रेन डेड झाला होता. त्यानंतर तिच्या पालकांनी अवयवदानाचा मोठा निर्णय घेतला. आणि रेव्यानीचं हृदय मुंबईतल्या दोन वर्षाच्या लहान मुलीला देण्यात आलं. किडनी चेन्नईच्या एका मुलीला देण्यात आली. तर यकृत आणि डोळे नागपुरात दान करण्यात आले. आपलं दु:ख विसरत रेव्यानीच्या पालकांनी तिच्याच वयाच्या इतरांना जीवनदान दिलं आहे. त्यामुळे रेव्यानी तिच्या मृत्यूनंतरही या जगात जिवंत राहणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram