गोंदियाच्या बाजारात 'आय लव्ह पाकिस्तान' छापलेले फुगे, तपास सुरु
Continues below advertisement
नवरात्र उत्सावाला गालबोट लावून सामाजिक सलोखा खराब करण्याचा प्रयत्न गोंदियातल्या काही समाजकंटकांडून सुरु आहे. गोंदियातल्या अनेक दुर्गामंडळांच्या मंडपाबाहेर काही चिमुकली मुलं पाकिस्तान झिंदाबाद असं लिहिलेले फुगे विकताना आढळून आली. धार्मिक कार्यक्रमांवेळी जातीय सलोखा बिघडावा, यासाठी अज्ञात लोकांनी या मुलांकडे हे फुगे विकण्यासाठी दिल्याचा दाट संशय आहे.
दरम्यान, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हे सर्व फुगे विकत घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केली आहेत. पण अशा प्रकारचे फुगे गोंदियात कुठून आले, ते लहान मुलांच्या हातात कुणी सोपवले, याचा तपास सुरु आहे. लोकांनी मात्र अशा प्रकारांना बळी न पडता शांतता राखावी, असं आवाहन पोलिसांनी केलंय.
Continues below advertisement