गोंदिया : बाघ नदीवरील पूल ओलांडताना टॅंकर वाहून गेला
गोंदिया जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नदी, नाले दुथडी वाहताहेत, त्यात बाघ नदीलाही पूर आलाय. या पुरात मध्यप्रदेशच्या बालाघाटहून आलेला दुधाचा टँकर वाहून गेलाय. काल संध्याकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली आहे. बाघ नदीवरील पूल ओलांडताना ट्रकचालकाला पुलाचा अंदाज आला नाही आणि दुर्घटना घडली... स्थानिकांनी पोलिसांना आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाला याची माहिती दिली. त्यानंतर आता या टँकर आणि चालकाचा शोध घेतला जातोय मात्र अजूनही त्याचा पत्ता लागलेला नाही.