
Gold Rate Increased | सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, का वाढतायत सोन्याचे दर | जळगाव | ABP Majha
सोन्याला पुन्हा एकदा ऐतिहासिक झळाळी आली आहे. सोन्याच्या दराने गेल्या सहा वर्षातील उच्चांक गाठला आहे. सोन्याचा दर प्रतितोळा 34 हजारांच्या वर गेला आहे. सोन्यासाठी प्रतितोळा 34 हजार 700 रुपये मोजावे लागत आहेत.
अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव, विविध देशांसमोबत अमेरिकेचा सुरु असलेला व्यापार आणि केंद्रीय बँकांचा व्याजदर कपातीचा निर्णय यामुळे सोन महागलं आहे. येत्या काही दिवसात सोन्याचा दर आणखी वधारण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत सोन्याचा दर 38 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.