Gold rates hike | आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या भावानं पाच वर्षांमधला उच्चांक गाठला | ABP Majha
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या भावानं पाच वर्षांमधला उच्चांक गाठला आहे. येत्या काळामध्ये अमेरिकेत व्याजदरांमध्ये कपात होण्याचे संकेत मिळाले असून त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणुकीला पसंती दिल्याचे दिसत आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वधारले असून त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारात दिसणार आहे. त्याचप्रमाणे अमेरिका व चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळेही मे महिन्यात सोन्याच्या भावांनी आठ टक्क्यांची वाढ बघितली होती.