Gokul Meeting | गोकुळच्या सभेत यंदाही गोंधळ, महाडिक-पाटील गट आमनेसामने | कोल्हापूर | ABP Majha

Continues below advertisement
गोकुळची सभा म्हणजे वादविवाद, तणाव, राडा, पोलिस बंदोबस्त हे ठरलेलंच. यंदाही ती परंपरा कायम राहिली. गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत आधी ठरावावरुन आणि नंतर फराळ न मिळाल्यावरुन गोंधळ झाला. गोकुळच्या आजच्या सभेत विरोधकांनी गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा ठराव मांडण्याची मागणी केली होती. मात्र असा ठराव सभेत करता येत नसल्याचं अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी सांगितल्यानंतर गोंधळ सुरु झाला. यानंतर सतेज पाटील आणि महाडिक गट आमनेसामने आला. "आमचं ठरलंय आता गोकुळ उरलंय" अशी घोषणाबाजी सतेज पाटील गटाने केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram