नाशिक : गोदावरी दूषित करणाऱ्या कंपन्यांचं वीज आणि पाणी तोडलं

Continues below advertisement
गोदावरी नदीच्या प्रदुषणात भर घालणाऱ्या 7 कंपन्यांना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळानं नोटीस बजावलीय. तसंच 5 कंपन्यांची वीज आणि पाणी सेवा बंद करण्यात आलीय. औद्योगिक वसाहतीत एसटीपी प्रकल्प नसल्यानं या कंपन्यांमधलं रसायन मिश्रित पाणी, सांडपाणी नाल्याच्या माध्यमातून थेट गोदापात्रात सोडलं जात होतं.. याविरोधात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात झाली. तेव्हा या समितीच्या पाहणीत आय टी क्षेत्रातील प्रख्यात इएसडीएस, प्रसिद्ध बुधा हलवाई, अनिलकुमार प्रायव्हेट लिमिटेड यासह सात कंपन्यांना दोषी आढळल्या. गेल्या वर्षभरात नियम धाब्यावर बसविणाऱ्या १२७ कंपन्यांवर कारवाई करण्यात आलीय 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram