गोव्यामध्ये बर्निंग ट्रेनचा थरार, मयेजवळ रोरो रेल्वेतून नेण्यात येणाऱ्या ट्रकला आग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Feb 2018 01:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गोव्यातल्या मये येथे रेल्वे ट्रॅकवर रोरो रेल्वेतून नेण्यात येणाऱ्या एका ट्रकला आग लागली. या आगीत ट्रकचा समोरील भाग जळून खाक झाला. रेल्वेचालकानं प्रसंगावधान दाखवत वेळीच रेल्वे थांबवल्यानं मोठी दुर्घटना टळली. तर, रेल्वे कर्मचारी, ओल्ड गोवा आणि डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग विझवली. सुमारे 15 किमीपर्यंत पेटत्या ट्रकसह धावणारी रेल्वे पाहून अनेकांनी बर्निंग ट्रेनचा अनुभव घेतल्याचं सांगितलं.