गोवा : राहुल गांधींना सर्जिकल स्ट्राईकवेळी लष्करासोबत पाठवायला हवं होतं- पर्रिकर

राहुल गांधींना सर्जिकल स्ट्राईकवेळी लष्करासोबत पाठवायला हवं होतं. मग त्यांचा सर्जिकल स्ट्राईकवर विश्वास बसला असता, अशी उपहासात्मक टीका गोव्याची मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली आहे.
काल पणजी येथील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. सर्जिकल स्ट्राइक करून आपण गोव्यावरचे देशाचं कर्ज फेडलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मी सर्जिकल स्ट्राईकविषयी राजकीय अर्थानं बोलत नाही. मात्र या ऑपरेशनवर विश्वास बसण्यासाठी विरोधी पक्षातील लोकांना सर्जिकल स्ट्राईकवेळी लष्करानं सोबत न्यायला हवं होतं का?' अशी विचारणा पर्रिकर यांनी केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola