गोवा: फिरायला गेलेल्या महिला पर्यटकावर लैंगिक अत्याचार
Continues below advertisement
गोव्यात फिरायला गेलेल्या एका महिला पर्यटकावर लैंगिक अत्याचार झालाय. या महिलेच्या फेसबूक पोस्टवरुन घडलेला प्रकार उजेडात आलाय. संबंधित महिला प्रजासत्ताक दिनाला जोडून आलेल्या सुट्टयांमध्ये गोव्याला गेली होती. या पर्यटक महिलेने हडफडे येथून बागा इथं जाण्यासाठी दुचाकी पायलटला बोलावले होतं. बागा इथं जात असताना इजिदोर फर्नांडीस नावाच्या दुचाकी पायलटने तिला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले.. घडलेला प्रकार या महिलेने फेसबूकवर पोस्ट केला.. त्यानंतर इमेलद्वारे केलेल्या तक्रारीनंतर पेडणे पोलिसांनी या 44 वर्षांच्या इजिदोरला अटक केलीय..
Continues below advertisement