गोव्यातील बोंडला अभयारण्यातून चार बिबट्यांचं पलायन
Continues below advertisement
गोव्यातील बोंडला अभयारण्यातून चार बिबट्यांनी पलायन केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पळालेल्या चारपैकी तीन बिबट्यांना जेरबंद करण्यात वन खात्याला यश आलं, मात्र एक बिबट्या अद्यापही मोकाट आहे.
बोंडला अभयारण्यात एकूण पाच बिबटे असून त्यांना पिंजऱ्यात ठेवण्यात आलं आहे. या पिंजऱ्याला जोडूनच बिबट्यांना मुक्त विहारासाठी लोखंडी तारेचं कुंपण घालून जागा आरक्षित करण्यात आली आहे. या पिंजऱ्याचं कुलूप कोणीतरी तोडलं, त्यानंतर शनिवारी पहाटेच्या सुमारास पाचपैकी चार बिबट्यांनी पलायन केलं.