गोवा | पणजीत रंगली मासेमारीची अनोखी स्पर्धा
गोव्याच्या राजधानीत मासेमारीची अनोखी स्पर्धा रंगली..यूनाइटेड फ्रेंड्स ऑफ पणजी तर्फे गोमंतकीयांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी मासेमारी स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा स्पर्धेचे 12 वं वर्ष आहे...दरवर्षी स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतच आहे..राज्यभरातून जवळपास ८० स्पर्धक यात सहभागी झाले होते..कोणी रॉड घेऊन तर कोणी फक्त रील टाकून आपापल्या पद्धतीनं मासेमारी करताना पाहायला मिळाले.