पणजी : काँग्रेस गोव्यात सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत
Continues below advertisement
कर्नाटकचा बदला गोव्यात घेण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. गोव्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. जो न्याय कर्नाटकला लावला तोच गोव्यात लावण्याची मागणी काँग्रेस करणार आहे. गोव्यातील काँग्रेसचे प्रभारी चेल्ला कुमार आज गोव्याला दाखल होणार असून ते आणि पक्षाचे इतर नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. गोव्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण द्यावं, अशी मागणी काँग्रेस करणार आहे.
Continues below advertisement