गोवा : तीन महिन्यांच्या उपचारांनंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गोव्यात परतले
Continues below advertisement
5 मार्च रोजी स्वादुपिंडावरील उपचारासाठी अमेरिकेत गेलेले मुख्यमंत्री जवळपास सव्वातीन महिन्यानंतर गुरुवारी (14 जून) गोव्यात पोहोचले. सायंकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी पर्रिकर दाबोळी विमानतळावरुन बाहेर पडून आपल्या दोनापावल येथील खाजगी निवासस्थानी गेले. पर्रिकर यांचे विमानतळावर स्वागत करण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे वगळता एकही आमदार, मंत्री किंवा पदाधिकारी उपस्थित नव्हता. पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर, आरोग्यमंत्री राणे आणि पर्रिकर यांची दोन्ही मुलं तसंच खाजगी सचिव रुपेश कामत एवढीच मोजकी मंडळी पर्रिकर यांच्यासोबत होती.
Continues below advertisement