पणजी : स्वादुपिंडाच्या आजारामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात, प्रकृती स्थिर

Continues below advertisement
प्रकृती ठीक नसल्यानें काही दिवसांपासून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर मुंबईतल्या लीलावती रूग्णालयात दाखल आहेत... काल पंतप्रधान मोदींनी आपले कार्यक्रम आटोपल्यानंतर लीलावती रूग्णालयात पर्रिकरांच्या प्रकृतीची विचारपूस केली... दरम्यान मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असं आवाहन करणारं पत्र लिलावती रुग्णालयाने प्रसिद्ध केलं आहे...
गेल्या 4 दिवसांपासून पर्रिकर हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे लिलावती रुग्णालयात दाखल आहेत... शिवाय पर्रिकर यांच्या उपचारांना बराच कालावधी लागणार असल्याचं कळतंय... त्यामुळे गोवा विधानसभेचं 22 दिवसांचं अधिवेशन फक्त 3 दिवस करावं अशी मागणी गोवा भाजप करणार आहे...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram