मुंबई : गिरगावच्या कबुतरखान्याची शिवसैनिकांकडून तोडफोड
मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कबुतरखान्याची तोडफोड केली. जैन समाजाकडून बांधला जाणारा हा कबुतरखाना अनधिकृत असल्याचा दावा शिवसेनेनं केला. मीरा भाईंदर निवडणुकीत जैन मुनींनी भाजपचा प्रचार केल्याचा आरोप होतोय. त्यानंतर शिवसेना जैन मुनींविरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे.