ठाणे | घोडबंदर गावात बिबट्या दिसल्याने खळबळ, नागरिकांमध्ये भिती
घोडबंदर गावात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेजवळच घोडबंदर गाव असल्याने येथे बिबट्यांचा वावर असल्याचे अनेकदा समोर आले आहे. काही दिवसांपासून बछड्यांसह बिबट्यांची संख्या वाढल्याने गावात त्यांचा वावरही वाढल्याचे ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजवरून निदर्शनास आले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ग्रामस्थांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली आणि नागपूर वनविभागाला पत्रव्यवहार केला आहे.