मुंबई : घाटकोपरमध्ये दोन चोरट्यांच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी
घाटकोपर स्थानक परिसरात एका तरुणावर जीवघेणा हल्ला करत लुटल्याची घटना समोर आली आहे. सागर हिवरकर असं या तरुणाचं नाव आहे. पहाटे 5 वाजता ठाण्याकडे जाण्यासाठी लोकल पकडण्यासाठी घाटकोपर स्थानक येथे जात होता.परंतु खोत लेन येथे त्याला दोन जणांनी अडवले.त्याची बॅग,पॉकेट आणि मोबाईल हिसकावून घेत त्याच्या पोटात आणि हातावर चाकूने हल्ला केला.यात तो गंभीर जखमी झाला. यावेळी अनेक प्रवासी इथून जात होते परंतु त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही.
Tags :
????? ???????