घाटकोपर : खड्ड्यांना पालिका अधिकाऱ्यांची नावं, राष्ट्रवादीचं अनोखं आंदोलन

Continues below advertisement


मुंबईत पडलेल्या खड्ड्यांमुळे राजकीय पक्षांच्या आंदोलनाला घुमारे फुटू लागले आहेत. मनसे, काँग्रेस पाठोपाठ आता राष्ट्रवादीनेही महापालिकेच्या कारभाराचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. घाटकोपरमधील खड्ड्यांचा नामकरण सोहळा पार पडला. या खड्ड्याने मुंबईचे आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांची नावे देण्यात आली. यावेळी त्यांच्या नावाच्या घुगऱ्याही वाटण्यात आल्या. अगदी पारंपरिक पद्धतीने गाणीही यावेळी म्हणण्यात आली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram