मुंबई : घाटकोपर ईस्ट वेस्टला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद, पूल झुकल्याची शंका

Continues below advertisement
घाटकोपर- वर्सोवा लिंक रोडला  जोडणारा पूल बंद करण्यात आला आहे. खालच्या बाजूला पूल झुकल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून पूल बंद करण्यात आला आहे. अंधेरी दुर्घटनेनंतर पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं. त्यात हा पूल धोकादायक स्थितीत असल्याचं म्हटलं गेलं. मुंबई महापालिकेनं याबाबतची माहिती काल पोलिसांना दिली होती. त्यानंतर रात्रीपासून पोलिसांनी हा पूल बंद करण्यात आला आहे. नुकतीच अंधेरीतील गोखले पूलाची दुर्घटना ताजी आहे. यासारखी दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासनाकडून योग्य़ ती खबरदारी घेतली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram