जर्मनी : बर्लिनमध्ये हातात चाकू घेऊन माथेफिरुचा दहशत पसरवण्याचा प्रयत्न
Continues below advertisement
जगभरात सध्या दहशतवादाचं असलेलं सावट पुन्हा पुन्हा आपला क्रूर चेहरा दाखवत आहे. दहशत पसरवण्याच्या उद्देशाने शस्त्र घेऊन चर्चमध्ये घुसलेल्या हल्लेखोराला बर्लिन पोलिसांनी अटक केली. जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिनमध्ये रविवारी सकाळी चर्चमध्ये सुरु असलेल्या प्रार्थनेदरम्यान ही घटना घडली. परंतु यामध्ये कोणतीही दहशतवादी संघटना सामील नाही, असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं आहे.
हातात चाकू घेऊन आरडाओरडा करणाऱ्या 53 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी बर्लिन पोलिसांना त्याच्या पायावर गोळी झाडावी लागली. ही घटना घडली केव्हा चर्चमध्ये साधारण 100 व्यक्ती उपस्थित होत्या. हातात चाकू घेतलेल्या व्यक्तीला चाकू फेकावा, अशी विनंती पोलिसांनी केली. पण त्यानंतरही तो आक्रमकच पवित्रा ठेवला. त्यामुळे पोलिसांना त्याच्या पायावर गोळी झाडावी लागली. आयसीसच्या रडावर जर्मनी नेहमीच असल्यामुळे पोलिसांना विशेष लक्ष द्यावं लागतं आहे.
Continues below advertisement