पुणे : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन
Continues below advertisement
कर्नाटकातील सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचं पुणे कनेक्शन समोर आलंय. गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणात कर्नाटक पोलिसांनी तीन दिवसांपुर्वी चार जणांना अटक केली. त्यातील अमोल काळे हा एक आरोपी चिंचवडमधील राहणारा आहे. अमोल हा आपले आई-वडील, पत्नी, मुलगा यांच्यासोबत राहतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून गायब होता. अमोल हा हिंदू जनजागृती समितीशी संबंधित असल्याचं पोलीस चौकशीत समोर आलंय.
५ सप्टेंबर २०१७ मध्ये गौरी लंकेश यांची त्यांच्या पश्चिम बंगळुरूतील घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती.
५ सप्टेंबर २०१७ मध्ये गौरी लंकेश यांची त्यांच्या पश्चिम बंगळुरूतील घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती.
Continues below advertisement