गाव तिथे माझा : लातूर : बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने टोमॅटो फुकट वाटले

बाजारामध्ये भाव मिळत नसल्याने लातूरात एका शेतकऱ्याने मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेले टोमॅटो फुकटात वाटले. सुरेश भुरकापल्ले असं या शेतकऱ्याचं नाव आहे.
लातूरच्या हाळी हंडरगुडी इथल्या आठवडी बाजारात ही घटना घडली.
टोमॅटोची विक्री करून साधा वाहतुकीचा खर्च आणि तोडणीचा खर्चही निघत नसल्यामुळे विक्री साठी आणलेले टोमॅटो फुकट घेऊन जाण्याचं आवाहन त्याने नागरिकांना केलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola