गाव तिथे माझा : कोल्हापूर : उद्यापासून शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा मिळणार
राज्यातील शेतकऱ्यांच्या सोयीचा एक महत्त्वाचा निर्णय उद्यापासून अंमलात येतोय. कारण, उद्या म्हणजे १ मे पासून ऑनलाईन सातबारा देण्यात येणार आहे. शासनाच्या भूमिअभिलेख विभागाने अचूक संगणकीकृत सातबारा देण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला होता. राज्यात ४३ हजार ९४८ महसूली गावे आहेत, यामधील संगणीकरणाचं काम आता अंतिम टप्यात आली असून एक मे पर्यंत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकताच व्यक्त केलाय.