गाव तिथे माझा : चंद्रपूर : माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी आदिवासी विद्यार्थी सज्ज
जगातील सर्वात उंच असं माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील 10 आदिवासी विद्यार्थी सज्ज आहेत.
या साठी एका विशेष कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं.प्रियदर्शिनी सभागृहामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला होता.
या वेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आणि पालकमंत्री सूधीर मुनगंटीवारही उपस्थित होते.
या मोहिमेला मिशन शौर्य असं नाव देण्यात आलंय.
तर या मोहिमेसाठी 7 मुलगे आणि 3 मुली सहभागी होणार आहेत.