Ganeshotsav 2019 | गणेश गल्लीच्या राजाला राम मंदिराचा देखावा | ABP Majha
आपल्या लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी घराघरात लगबग सुरु आहे. मोठ्या उत्सहात आणि आनंदात बाप्पांच्या स्वागताची तयारी केली जातेय. घरगुती गणपतीसोबत सार्वजनिक गणपती मंडळांचाही थाट बघायला मिळतो. गणेश गल्लीच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पाहटेपासून गर्दी केली आहे. इथे यंदा राम मंदिराचा देखावा उभारण्यात आला आहे.