रत्नागिरी : पर्यटकांचा अतिउत्साह, गणपतीपुळेजवळ कार समुद्रात अडकली
पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे एक गाडी समुद्रात अडकली आहे. रत्नागिरीतील गणपतीपुळे मार्गावरील नेवरे काजीर भाटी समुद्र किनाऱ्यावर ही घटना घडली आहे. खरंतर स्थानिक सुरक्षा रक्षकांनी पर्यटकांना समुद्रावर गाडी घेऊन जाऊ नका अशा सूचना दिल्या होत्या. मात्र त्या पाळल्या नाहीत. त्यामुळे हा उत्साह पर्यटकांना चांगलाच महागात पडला आहे. अखेर स्थानिकांच्या मदतीनं जेसीबीच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली आहे. हे सर्व पर्यटक लातूर जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.