गडचिरोली : नक्षलवाद्यांचं 25 मे रोजी बंद पाळण्याचं आवाहन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 May 2018 11:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्र, ओडिशा, आणि छत्तीसगड राज्यात येत्या २५ मे रोजी बंद पाळण्याचं आवाहन नक्षलवाद्यांनी केलं आहे. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील बेज्जूर गावाजवळ नक्षलवाद्यांनी बंदचं आवाहन करणारी बॅनर आणि पत्रके टाकली आहेत. कस्नासूर आणि आयपेटा इथल्या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मृतीनिमित्त १९ ते २५ मे दरम्यान नक्षलवादी संघटना प्रतिरेध सप्ताह साजरा करत आहेत.