गडचिरोली : पोलिसांसोबतच्या चकमकीत 3 नक्षलवाद्यांचा खात्मा
Continues below advertisement
गडचिरोलीमध्ये पोलीस चकमकीत तीन माओवादी ठार झालेत... गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात ही चकमक झालीये...
गेल्या काही दिवसातली ही सगळ्यात मोठी कारवाई मानली जाते.. कारण ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये सुनिल कुळमेथे या जहाल माओवाद्याचाही समावेश आहे. त्याच्यावर शासनाने ८ लाख रुपयांचं बक्षीस जाहिर केलं होतं. सुनिल कुळमेथेसोबत आणखी दोन महिला माओवादीही चकमकीत मारल्या गेल्यात... त्यात सुनिलच्या पत्नीचाही समावेश असल्याची शक्यता आहे. सिरोंचा तालुक्यातील सिरकोंडा जंगलात पोलिसांनी ही कारवाई केलीये. चकमकीनंतर संपुर्ण जंगल परिसरात कोंबींग ऑपरेशन सुरु करण्यात आलंय. गेल्या आठवड्याभरात तिन वेगवेगळ्या चकमकीत ५ माओवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय...