मुंबई : 20 वर्षांनी फ्रान्स पुन्हा एकदा विश्वविजेता, क्रोएशियावर 4-2 ने मात, कोल्हापुरात जल्लोष
Continues below advertisement
फ्रान्सने अखेर 20 वर्षांनंतर फिफा विश्वचषकावर पुन्हा आपलं नाव कोरलं. मॉस्कोतल्या ल्युझनिकी स्टेडियमवरच्या सामन्यात फ्रान्सने झुंजार क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. फिफाच्या इतिहासात विश्वचषक जिंकण्याची फ्रान्सची ही दुसरी वेळ ठरली. फ्रान्सने याआधी 1998 साली ब्राझिलचा 3-0 असा धुव्वा उडवून विश्वचषक जिंकला होता. फ्रान्सचे विद्यमान प्रशिक्षक डिडियर डेशॉ यांच्याच नेतृत्त्वाखाली फ्रान्सने 1998 सालचा विश्वचषक जिंकला होता. सामना सुरु झाल्यानंतर फ्रान्सच्या मानजुकिचने अठराव्या मिनिटालाच पहिला गोल डागला. त्यानंतर पेरिसिसने गोल डागत 28 व्या मिनिटाला बरोबरी साधली. सामन्यात रंगत चढली असतानाच फ्रान्सला पेनल्टी किक मिळाली, ज्याचा फायदा घेत फ्रान्सच्या ग्रीजमॅनने दुसरा गोल केला. फ्रान्सने आपली आघाडी कायम राखत अखेर क्रोएशियावर 4-2 ने मात केली आणि 20 वर्षांनी विश्वचषक विजयाचं स्वप्न पूर्ण केलं.
Continues below advertisement