Historical Places | लग्नसमारंभ, हॉटेलिंगसाठी गडकिल्ले भाडेतत्वावर मिळणार नाहीत : पर्यटन विभाग | ABP Majha

Continues below advertisement
राज्यातील गडकिल्ले भाडेतत्वावर देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याच्या बातम्या आल्यानंतर चहूबाजूने टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर राज्याच्या पर्यटन विभागाने याबाबत स्पष्टीकरण दिलंय. राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेल्या गडकिल्ल्यांचा समावेश वर्ग एकमध्ये होतो. तर अन्य गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळं वर्ग दोन मध्ये मोडतात. त्यातील वर्ग दोनमधील ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित गडकिल्ले भाड्याने देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं स्पष्टीकरण पर्यटन विभागाने दिलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram