मुंबई : रासायनिक इंजेक्शन देऊन मुंबईतील झाडांची कत्तल, प्रशासनाचं दुर्लक्ष
Continues below advertisement
एकीकडे राज्यभरात वृक्षलागवडीचे मोहिम सुरु असताना मुंबईतील डेरेदार झाडांचा जीव घेतला जातोय. फोर्ट परिसरातील झाडं रासायनिक पद्धतीने इंजेक्शन देऊन सुकवली जातायेत आणि त्यानंतर त्यांना नष्ट केलं जातंय. मोठमोठी शोरुम आणि दुकानांना या झाडांची अडचण होत असल्याने त्यांचा बळी घेतला जात असल्याचा आरोप होतोय. याबाबत पर्यावरण विभाग आणि महापालिका प्रशासनन यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र याप्रकरणी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाहीय.
Continues below advertisement