VIDEO | शंकरसिंह वाघेला अखेर राष्ट्रवादीच्या गळाला | अहमदाबाद | एबीपी माझा
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाघेलांनी अहमदाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल यावेळी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी वाघेला आणि शरद पवारांची भेट झाली त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचा साथ देण्याचा निर्णय घेतला. वाघेला यांनी आपल्या कारकीर्दीला भाजपमधून सुरुवात केली पण 1996 मध्ये भाजप सोडून त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आणि गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2017 साली त्यांना पुन्हा काँग्रेसला रामराम केला. त्यानंतर राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांनी अहमद पटेलांविरोधात भाजपलाही मदत केली.