VIDEO | कॉंग्रेसनेत्या प्रिया दत्त यांची प्रियांका गांधींच्या नियुक्तीवरील प्रतिक्रिया | एबीपी माझा
प्रियंका गांधी आत्तापर्यंत काँग्रेसमध्ये केवळ पडद्याआडच काम पाहत होत्या. लोकसभा निवडणुकीत अमेठी, रायबरेली या दोन मतदारसंघांचीच जबाबदारी त्यांच्यावर असायची. राहुल गांधी अध्यक्षझाल्यानंतर प्रियंकांच्या एन्ट्रीची चर्चा थांबलीय असं वाटत असतानाच काँग्रेसनं आज ही सरप्राईज खेळी केली. संघटनेत पहिल्यांदाच अधिकृतपणे त्यांना पद देण्यात आलं आहे. एका अर्थानं त्यांच्याराजकीय प्रवेशाची औपचारिकता पूर्ण झाली आहे. यावर कॉंग्रेसनेत्या प्रिया दत्त यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे.