VIDEO | मेळघाटात गावकऱ्यांची वन कर्मचारी, पोलिसांवर दगडफेक | अमरावती | एबीपी माझा
अमरावतीच्या मेळघाटच्या जंगलात पुनर्वसित गावकरी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांत टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला. गावकऱ्यांनी वन अधिकारी आणि पोलिसांवर तुफान दगडफेक केली. सरकारी गाड्यांचीही तोडफोड केली. गावकऱ्यांच्या हल्ल्यात 50 वन कर्मचारी आणि 15 पोलिस कर्मचाऱी जखमी झाले.