नवी दिल्ली : परस्पर सहमतीनं घटस्फोटासाठी 6 महिने थांबण्याची गरज नाही: सुप्रीम कोर्ट

Continues below advertisement
परस्पर सहमतीनं घटस्फोट घेण्यासाठी यापुढे पती-पत्नीला सहा महिने थांबणं अनिवार्य नसल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला. हिंदू विवाह कायद्याचं कलम 13 ब (2) हे अनिवार्य नसल्याचं सुप्रीम कोर्टानं काल दिलेल्या निर्णयात म्हटलं. या कलमाअंतर्गत घटस्फोटाचा अर्ज केल्यानंतर 6 महिने वाट पाहण्याची अट होती. पती-पत्नी पुन्हा एकत्र येऊ शकतात का? यावर विचार करता यावा यासाठी 6 महिन्यांचा कालावधी देण्यात यायचा.. मात्र आता 6 महिन्यांचा वेळ द्यायचा की नाही हे दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशांवर अवलंबून असणार आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram