इरमा चक्रीवादळाचा फ्लोरीडाला तडाखा, जनजीवन विस्कळीत
Continues below advertisement
अमेरिकेत इरमा चक्रीवादळानं अमेरिकेची दाणादाण उडवली आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका मियामी शहराला बसला आहे. कॅरेबिअन बेटांवर थैमान घातल्यानंतर आता हे वादळ फ्लोरिडाच्या किनारपट्टीला इरमा चक्रीवादळ धडकलं आहे. यामध्ये तब्बल 200 किमी प्रतितासाच्या वेगानं वारे वाहत आहे आणि जोरदार पाऊसही सुरु आहे. यामुळे सगळ्या फ्लोरिडामध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच नागरिकांना रस्ते मार्गानं जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या वादळामुळे फ्लोरिडातील 60 लाख नागरिकांवर स्थलांतरणाची वेळ आली आहे, तर 10 लाख घरांमधला वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
Continues below advertisement