मुंबई: कोल्हापूर- मुंबई विमानसेवा आजपासून सुरु
गेली 6 वर्षांपासून रख़डलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून पुन्हा सुरु होणार आहे... त्यामुळे कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा पंख मिळणार आहेत.,. दुपारी 2 वाजता विमान मुंबईहून उड्डाण घेऊन कोल्हापूरला पोहोचेल, आणि तेच विमान संध्याकाळी मुंबईच्या दिशेने रवाना होईल. या पहिल्या विमान प्रवासात शेतकरी, अनाथ आणि अपंग मुले आणि कचरा वेचणाऱ्या महिलांना विमान प्रवास घडवण्याचं नियोजन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं आहे.