Kolkata Howrah Fire | हावडा ब्रिजजवळील केमिकल कंपनीला भीषण आग, आगीमुळे कंपनीचा काही भाग कोसळला | कोलकाता | ABP Majha
कोलकात्यातील हावडा ब्रिजजवळील जगन्नाथ घाटात एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. मध्यरात्री 2 च्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी प्रयत्न करताहेत. संपूर्ण परिसरात धुराचे लोण पसरलं आहे. आतापर्यंततरी आगीत कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.