Mumbai MTNL Fire | वांद्र्यातील आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचा रोबो घटनास्थळी दाखल | मुंबई | ABP Majha
एमटीएनएलच्या वांद्रे येथील इमारतीत भीषण आग लागली आहे. आग लागलेल्या इमारतीच्या गच्चीवर 90 हून अधिक लोक अडकले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आतापर्यंत 60 जणांना शिडीच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. तर 30 पेक्षा जास्त लोक अद्यापही गच्चीवर अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे आणि आग विझवण्याचे काम सुरु आहे. अग्निशमन दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, या दुर्घटनेत अद्याप कोणीही जखमी झालेलं नाही.