Pune Fire | पुण्यातील देवाची उरळीत साडी सेंटरला आग, पाच कामगारांचा मृत्यू | पुणे | ABP Majha
पुण्यातील देवाची उरुळी इथं आज पाहटे भीषण अग्नितांडव बघायला मिळालं. आज पहाटे साडीच्या सेंटरला लागलेल्या आगीत पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजयोग साडी सेंटर या दुकानाला पहाटे आग लागली. यात दुकानातील पाच कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची माहिती आहे.
या ठिकाणी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तर खाजगी दहा टँकर दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण ठेवण्यात आलंय. ही आग कशामुळे लागली याचा शोध अद्याप लागलेला नाही.
या ठिकाणी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तर खाजगी दहा टँकर दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण ठेवण्यात आलंय. ही आग कशामुळे लागली याचा शोध अद्याप लागलेला नाही.