मुंबई : प्रियंका चोप्रा लवकरच विवाहबंधनात, 'भारत' सिनेमाच्या दिग्दर्शकांची माहिती
Continues below advertisement
देसी गर्ल प्रियका चोप्राच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी.. सध्या बॉलिवूडपासून दूर असलेली पिगी चॉप्स अर्थात प्रियंका चोप्रा ऑक्टोबरमध्ये प्रियकर निक जोन्ससोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे,...इतकच नाही तर प्रियंकानं तिच्या वाढदिवशी निक सोबत साखरपुडा केल्याचंही कळतंय.. प्रियंकाच्या लग्नाचं सूतोवाच बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अली अब्बास जफर याने ट्विटमधून दिलेत... निकसोबतच्या लग्नाच्या तयारीसाठी प्रियंकानं सलमान सोबतच्या भारत सिनेमातून काढता पाय़ घेतलाय... प्रियंकाचा बॉयफ्रेंड निक जोन हा प्रसिद्ध अमेरिकन गायक गायक आहे.. वर्षभरापासून प्रियांका आणि निक एकमेकांना डेट करत आहे. २०१७ मधील मेट गालाच्या इव्हेंटमध्ये प्रियांका आणि निक हे जोडपं पहिल्यांदा दिसलं. तेव्हापासून या दोघांच्या नात्याची चर्चा होती.... ‘पिपल’ मासिकाच्या वृत्तानुसार निक आणि प्रियांकाचा साखरपुडा गेल्या आठवड्यातच झाला. निकनं प्रियांकासाठी सर्वात आलिशान टीफिनी ब्रँडची अंगठीही खरेदी केली असल्याचं संबधित मासिकानं म्हटलं आहे. प्रियांका ३६ वर्षांची आहे तर निक २५ वर्षांचा आहे. जून महिन्यात प्रियंकाच्या आईला आणि कुटुंबातील इतर मंडळींना निक भेटला.. प्रियंकाही निकच्या भावाच्या लग्नाला गेली होती,, त्यामुळे या दोघांचं नातं आणखी हायलाईट झालं...
Continues below advertisement