खेळ माझा : फेडरेशन चषक पारितोषिक वितरणाकडे महाराष्ट्राच्या खेळाडूंची पाठ

Continues below advertisement
फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धेत उपांत्य फेरीत हार स्वीकाराव्या लागलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पारितोषिक वितरण सोहळ्याकडे पाठ फिरवली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दाखवलेल्या या अखिलाडूवृत्तीविषयी उपस्थित क्रीडारसिकांमध्ये आश्चर्याची भावना होती. फेडरेशन चषक कबड्डीचं यजमानपद महाराष्ट्राकडे होतं. महाराष्ट्राच्या वतीनं मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशननं फेडरेशन चषकाचं आयोजन केलं. महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडिगा हा तर उपनगरचाच खेळाडू आहे. असं असतानाही महाराष्ट्राचा एकही  खेळाडू पारितोषिक वितरणाला उपस्थित राहिला नाही. त्यांच्या अनुपस्थितीत प्रशिक्षक माणिक राठोड आणि व्यवस्थापक फिरोज पठाण यांनी तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram