नाशिक : शेतकऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस, भाज्यांच्या दरात मोठी वाढ
Continues below advertisement
शेतकरी संपाचा आज दुसरा दिवस आहे... या 10 दिवसांच्या काळात शेतकरी आपला कोणताही माल विक्रीसाठी काढणार नसल्याचा दावा किसान सभेच्या वतीनं करण्यात आलाय.त्याचा परिणाम आता शहारांवर बघायला मिळालाय... नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये नेहमीच्या तुलनेत जवळपास 40 टक्के भाजीपाला कमी आला आहे. त्यामुळे भाजीपाल्यांचे दर कडाडण्याची शक्यता आहे. हीच अवस्था पुणे आणि नाशिकमधील भाजीपाला मार्केटमध्ये पाहिला मिळाली.
राष्ट्रीय किसान महासंघाच्यावतीने 10 जून पर्यंत देशव्यापी संपाची हाक देण्यात आलीय...या संपात देशभरातील सुमारे 120 शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत...तसेच संपात सहभागी शेतकऱ्यांनी धान्याची नासाडी करु नये अशी विनंती कृती समितीनं केलीय.