पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांवर ऊस जाळण्याची वेळ | बीड | 712 | एबीपी माझा
मराठवाड्यामधील शेतकऱ्यांना दरवर्षी सोसाव्या लागणाऱ्या समस्यांमध्ये दुष्काळाची समस्या प्रमुख असते. याच दुष्काळामुळे कधी पीक उगवायला पाणीच नसतं, तर कधी उगवलेलं पीक करपून जातं. बीडच्या शेतकऱ्यांनी तर आपल्या शेतातला ऊसच जाळून टाकलं. जवळपास दीड एकरात लागवड केलेल्या ऊसाला इथल्या शेतकऱ्यानी जाळून टाकलं.