मुंबई : शेतकरी चाहत्यासोबत शंकर महादेवन गाणार गाणं
Continues below advertisement
खेडोपाड्यात किती हिडन टॅलेंट असतं हे गायक शंकर महादेवन यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओतून पुन्हा समोर आलं आहे. या व्हिडिओमध्ये विश्वरूपम सिनेमातलं शंकर महादेवन यांनी गायलेलं गाणं एका शेतातील राकेश या मजूरानं गायलं आहे. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ कुणीतरी व्हायरल केला. आणि तो शंकर महादेवन यांच्यापर्यंत पोहोचला. त्याच्या आवाजानं भारावलेल्या शंकर महादेवन यांनी या व्हिडिओमधील मजुराला मग शोधून काढलं. आणि थेट त्यांच्याबरोबर गाण्याची ऑफर केली
Continues below advertisement