कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या, पेट्रोलच्या दरात घट होण्याची शक्यता
गेल्या 16 दिवसात देशात इंधन दरवाढ झाली असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. गेल्या 11 दिवसात कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरेल 4.21 डॉलरने कमी झाल्या आहेत. 17 मे रोजी तेलाची प्रति बॅरेल किंमत 79.50 डॉलर इतकी होती. त्यात घट होऊन ही किंमत आता 75.29 डॉलर प्रति बॅरेल इतकी झाली आहे. त्यामुळे देशातल्या पेट्रोल-डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे