सारा तेंडुलकरच्या फेक अकाऊंटवरुन शरद पवारांवर टीका
Continues below advertisement
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या साराच्या नावानं ट्विटरवर फेक अकाऊंट तयार करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या अकाऊंटवरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
‘शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राला लुटण्याचा प्रयत्न केला, हे सगळ्यांनाच माहित आहे. पण त्यांनी केंद्रालाही लुटायचा प्रयत्न केला, हे फारसं जगजाहीर नाही’ असं ट्वीट या अकाऊंटवरुन 9 ऑक्टोबर रोजी करण्यात आलं होतं.
Continues below advertisement