
Maharashtra Government Formation | दिल्लीत फडणवीस-शाह आणि पवार-गांधी यांची भेट | ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या दृष्टीने आजचा (4 नोव्हेंबर) दिवस महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज एकाच दिवशी दिल्लीत आहेत. अवकाळी पाऊसग्रस्तांना मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेणार आहेत. अर्थात या भेटीत राजकीय चर्चा होईलच. तर दुसरीकडे शरद पवारांची काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत राज्यातील सद्य परिस्थितीवर बातचीत करतील. परिणामी या दोन्ही नेत्यांच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Continues below advertisement